Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनुष्कावर चित्रित होणार ’सीआयडी’चे गाणे

अनुष्कावर चित्रित होणार ’सीआयडी’चे गाणे
, बुधवार, 1 एप्रिल 2015 (10:18 IST)
जुन्या काळातील गायिका गीता दत्त यांच्या आवाजामधील ब्लॅक अँड व्हाईट एराचे ‘जाता कहां है दीवाने’ या गाण्याला त्या काळी भरपूर प्रशंसा मिळाली होती. आता हेच गाणे नवीन रूपात ऐकण्यास मिळणार आहे. ‘बॉम्बे वेलवेट’ मध्ये या गाण्याचा समावेश करण्यात आला असून अनुष्का शर्मावर हे गाणे चित्रित करण्यात येणार आहे. चित्रपटामध्ये रोजी नोरोन्हा नावाच्या गायिकेची अनुष्का भूमिका करणार आहे.

1960 च्या दशकावर हा चित्रपट आधारित आहे. यादरम्यान म्हणजे 1956 मध्ये राज खोसला यांचे दिग्दर्शन आणि गुरू दत्त यांची निर्मिती असणारा ‘सीआयडी’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये या गाण्याचा समावेश होता.

अनुराग कश्यपचा रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा अभिनित या चित्रपटामध्ये ‘जाता कहां है दीवाने’ नवीन अंदाजात सादर करण्यात येणार आहे. अनुष्का या गाण्याला लिप-सिंक करणार आहे. मूळ गाण्याचे अधिकार खरेदी करण्यात आले आहेत. चित्रपटामध्ये रोजी जेव्हा हे गाणे गाते तेव्हा क्लबमधील सर्व उपस्थितांचे लक्ष वेधते. 15 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi