Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनुष्कासोबतच्या प्रेमसंबंधांची विराटने दिली जाहीर कबूली

अनुष्कासोबतच्या प्रेमसंबंधांची विराटने दिली जाहीर कबूली
मुंबई , शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (10:30 IST)
भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत प्रेमसंबंध असल्याची जाहीर कबूली दिली आहे. आम्ही दोघे वारंवार एकत्र दिसत असले तर  त्यासाठी वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे.
 
गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एकत्र दिसत आहेत. त्यामुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा रंगली होती. विराटने अनुष्‍कासोबतचे प्रेमसंबंध जाहीर केल्याने आता दोघांविषयीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. 
 
दरम्यान, एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांची भेट झाली होती. नंतर दोघांमध्ये प्रेम फुलले होते. इंग्लंड दौर्‍यात अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत गेल्याचे उघड झाले होते. न्यूझीलंड दौर्‍यातही हे दोघे हातात हात घालून फिरत असल्याचे एका छायाचित्रात कैद झाले होते.तसेच नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात अनुष्का शर्मा विराटला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. अर्धशतक ठोकल्यावर विराटने अनुष्काला फ्लाईंग किस दिले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi