Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असिनच्या लग्नाचे फोटो व्हायरल

असिनच्या लग्नाचे फोटो व्हायरल
, शनिवार, 11 एप्रिल 2015 (09:44 IST)
‘गजनी’ सिनेमातून आमिर खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी असिन पुन्हा एकदा चर्चेत आहे. असिनचा विवाह झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. वधूच्या वेशातील आणि हातावर मेंदी लावलेले असिनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून असं वाटतंय की असिन विवाहबंधनात अडकली आहे. असिनचे हे फोटो तिच्या आगामी ‘ऑल इज वेल’ या सिनेमातील आहेत, ज्यामध्ये तिचं लग्न झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. शूटिंगच्या सेटवरील हेच फोटो लीक झाले असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असिनने ‘खिलाडी 786’ मध्ये अक्षयकुमार आणि ‘रेडी’मध्ये सलमान खानसारख्या सुपरस्टारसोबतही काम केलं आहे. आता ती अभिषेक बच्चनसोबत रोमान्स करताना दिसेल.
 
नुकताच या सिनेमातील अभिषेक आणि षी कपूर यांचा लूक रिलीज झाला होता. उमेश शुक्ला दिग्दर्शित हा सिनेमा यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi