Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपल्या चाहत्याची अक्षयने मागितली माफी

आपल्या चाहत्याची अक्षयने मागितली माफी
बॉलिवूड अभिनेता अक्षयकुमारने आपल्या चाहत्याची माफी मागितली आहे आणि दिलगिरी व्यक्त केली आहे. सोशल नेटवर्किग साईटपैकी एक असलेल्या ट्विटरच्या माध्यमातून अक्षयने दिलगिरी व्यक्त केली आहे. सध्या प्रत्येकजण आपल्या आवडत्या सेलिब्रेटी, क्रिकेटर्स, राजकारण्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी प्रयत्न करत असतो. सार्वजनिक स्थळावर आपला आवडता व्यक्ती दिसला तर चाहत्यांना सेल्फी काढण्याचा मोह होतोच.
 
अशाच प्रकारे अक्षयच्या चाहत्याने मुंबई विमानतळावर अक्षयकुमारला पाहिले आणि त्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, सेल्फी क्लिक करण्यापूर्वीच अक्षयकुमारच्या बॉडीगार्डने त्या चाहत्याला मारहाण केली. हा सर्व प्रकार कॅमेर्‍यातही कैद झाला होता. या प्रकारानंतर आता अक्षयने ट्विट करत म्हटले आहे की, त्या दिवशी जो प्रकार झाला त्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. अचानक गोंधळ सुरु झाला, माझ्या बॉडीगार्डने एका चाहत्याला मारल्याचे मला कळले, असे व्हायला नको होते. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि बॉडीगार्डलाही मी पुन्हा असे न करण्यास सांगितले आहे. प्रत्येक चाहता माझ्यासाठी मोलाचा आहे, असा प्रकार भविष्यात होणार नाही असेही अक्षयकुमारने म्हटले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शालेय परीक्षेतही रिंकू ‘सैराट’च