Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'आप'चे कुमार विश्वास यांना पाच कोटींची ऑफर

'आप'चे कुमार विश्वास यांना पाच कोटींची ऑफर
नवी दिल्ली , बुधवार, 23 जुलै 2014 (14:25 IST)
आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांन बिग बॉस  या रियालिटी शो मध्ये सहभागी होण्यास सुमारे पाच कोटी रुपयांची  ऑफर मिळाली आहे. एवढेच नव्हे तर विश्वास गुगलच्या  कर्मचार्‍यांशीही संवाद साधणार आहे. तसेच कॅलिफोनिर्यातील स्टँडफोर्ड  युनिव्हर्सिटीत ते राजकारणावर व्याखान देणार आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसची निर्मिती करणार्‍या अॅडेमॉल  कंपनीने या शो मध्ये सहभागी होण्यासाठी कुमार विश्वास यांना पाच  कोटी रुपयांची ऑफर केली आहे. यावरून विश्वास यांची लोकप्रियता  देशात तसेच देशाबाहेर कमालीची वाढल्याचे चित्र आहे. राजकीय नेते  कुमार विश्वास लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. गीतकार  म्हणून विश्वास आपले नशीब आजमावणार आहे. विशेष म्हणजे  विश्वास यांच्या गीतांना प्रसिद्ध गायक आशा भोसले यांचा आवाज  लाभणार आहे. 
 
बिग बॉसच्या ऑफरबाबत कुमार विश्वास काय निर्णय घेतात, याकडे  संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi