Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमिरची इच्छा, मोदींनी पीके पाहावा

आमिरची इच्छा, मोदींनी पीके पाहावा
, मंगळवार, 9 डिसेंबर 2014 (13:36 IST)
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘पीके’ हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आमिरने कंबर कसली आहे. आमिरने पाटण्यातील एका मॉलमध्ये जाऊन ‘पीके’चं प्रमोशन केलं. त्यानंतर आमिरने एका ढाब्याजवळ लिट्टी-चोखा खाल्लं. यावेळी चाहत्यांनी आमिरभोवती गराडा घातला होता. प्रमोशनाचा पुढचा भाग म्हणून, आमिर आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच ‘पीके’ पाहण्याचं निमंत्रण देणार आहे. पंतप्रधानांनीही ‘पीके’ पाहावं, अशी इच्छा आमिरने व्यक्त केली आहे. पंतप्रधान नेहमीच कार्यमग्न   असतात, हे सर्वाना माहीत आहे. मात्र तरीही त्यांनी वेळ काढून ‘पीके’ पाहावा, असं आमिरने म्हटलं आहे. इतकंच नाही तर ‘पीके’च्या प्रीमियरसाठी येरवडा कारागृहातून संजय दत्त येणार असल्याचीही चर्चा आहे.
 
येत्या 19 डिसेंबरला आमिर खान आणि संजय दत्त यांची प्रमुख भूमिका असणारा ‘पीके’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या सिनेमात आमिर आणि संजय दत्तसह अभिनेत्री अनुष्का शर्मा, सुशांतसिंह राजपूत यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi