Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमिरच्या ट्रान्झिस्टरवर कोट्यावधीची बोली!

आमिरच्या ट्रान्झिस्टरवर कोट्यावधीची बोली!
मुंबई , बुधवार, 10 डिसेंबर 2014 (15:01 IST)
आमीर खानच्या 'पीके'या चित्रपटात आमीच्या हातात असलेल्या विशेष म्हणजे चोर बाजारातून 227 रुपयांमध्ये खरेदी केलेल्या ट्रान्झिस्टरला तब्बल कोट्यावधींची बोली लागली आहे. 'पीके' चि‍त्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले आणि आमिरच्या न्यूड पोजमुळे खळबळ माजली. या पोस्टरमध्ये आमीर एका ट्रान्झिस्टरसह दिसला होता. या 
ट्रान्झिस्टरची ऑनलाईन बोली लागली आहे, ज्यामध्ये या ट्रान्झिस्टरसाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हा ट्रान्झिस्टर मुंबईच्या चोर बाजारातून फक्त 227 रुपयांमध्ये खरेदी केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi