Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आलिया बनली जीनियस ऑफ द इअर

आलिया बनली जीनियस ऑफ द इअर
, रविवार, 31 ऑगस्ट 2014 (21:59 IST)
स्टुडंट ऑफ द इयर, हाइवे आणि टू स्टेटस सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी आलिया भट्टला घेऊन एआयबीने एक जबरदस्त व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत दाखविण्यात आले आहे की आलिया डम होती आणि कशी नंबर वन झाली. एआयबीने करन जोहर याच्या ‘कॉफी विथ करन’ च्या एका एपिसोडमध्ये आलियाने काही प्रश्नांची चुकीची उत्तरं दिली होती. त्यामुळे आलियावर सोशल मीडियामध्ये खूप जोक्स निर्माण झाले होते. त्यालाच सेंटर पॉइंट घेऊन हा व्हिडीओ बनविण्यात आला आहे. या व्हिडीओत आलिया सोबत अनेक तार्‍यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच एआयबीची टीमही या व्हिडीओचा हिस्सा आहे. पहिल्यांदा हा व्हिडीओ आलियाची इमेज मेकिंगचा प्रयत्न वाटतो पण व्हिडीओ संपतो तोपर्यंत आलिया पुन्हा आपल्या जुन्या रुपात दिसून लागते.

काही काळापासून सोशल मीडियावर अभिनेत्री आलिया भट्टच्या जीके (जनरल नॉलेज) वर काही जोक्स सुरू होते. यावर आलियाने सांगितले की या जोक्समुळे ती नाराज होत नव्हती पण तिला आनंद होत होता. कॉफी विथ करनमध्ये आलियाला भारताचे राष्ट्रपती कोण असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी तिने पृथ्वीराज चव्हाण असं उत्तर दिलं. यावेळी वरूण धवनने मनमोहनसिंग असं उत्तर दिलं होतं. केवळ सिद्धार्थ मल्होत्रा याने प्रणव मुखर्जी हे उत्तर दिलं होतं. यानंतर आलियाच्या सामान्य ज्ञानावर सोशल मीडियावर जोक्स तयार झाले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi