Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एडिनबर्ग विद्यापीठात शाहरुखचे खास व्याख्यान

एडिनबर्ग विद्यापीठात शाहरुखचे खास व्याख्यान
, शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (11:12 IST)
बॉलीवूड किंग शाहरुख खान 15 ऑक्टोबरला एडिनबर्ग विद्यापीठात विद्यार्थ्यांना खास व्याख्यान देणार आहे.

विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारतासोबत आमचे चांगले संबंध असून जागतिक सिनेसृष्टीतील एका उत्कृष्ट अभिनेत्याचे स्वागत करण्यासाठी आम्ही फारच उत्सुक आहोत. असे विद्यापीठाचे ज्येष्ठ उपप्राचार्य चार्ली जैफरी यांनी सांगितले.

परंतु 49 वर्षीय शाहरुखने याबाबत तूर्तास तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्याने विद्यापीठाच्या या पोस्टला रिट्विट केलं आहे. शाहरुखच्या या व्याख्यानासाठी तिकीटही उपलब्ध आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi