Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कंगना राणावत हिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

कंगना राणावत हिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
, मंगळवार, 24 मार्च 2015 (16:59 IST)
भारत सरकारने 64वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2014 जाहीर केले आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला हिंदी चित्रपट 'क्वीन'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येईल. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटासाठीदेखील क्वीन याच चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. वर्ष 2014च्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कन्नड अभिनेता विजय यांना देण्यात येईल.
 
या व्यतिरिक्त मेरी कोम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पॉपुलर चित्रपट आणि सुखविंदरला हैदर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून सन्मान देण्यात येईल. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी कोर्ट या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे, जो मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेतदेखील तयार झाला. हे पुरस्कार 3 मे रोजी देण्यात येतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi