Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कतरीना मसाला चित्रपट करणारच

कतरीना मसाला चित्रपट करणारच
IFM
चित्रपटांच्या निवडीबाबत कतरीना आता 'चूझी' झालीय. वेलकम आणि सिंह इज किंगसारखे चित्रपट करणारी कतरीना आता अभिनयाला वाव देणार्‍या न्यूयॉर्क, राजनीती या चित्रपटात काम करताना दिसतेय. पण असे असले तरी ज्या मसाला चित्रपटांनी आपल्याला हे ग्लॅमर मिळवून दिले ते करणारच असं ती सांगतेय.

आपण इथे जे काही आहोत, ते या चित्रपटांमुळेच, असं तिचं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे या चित्रपटांना सोडचिठ्ठी देण्याचा प्रश्नच येत नाही, असं ती म्हणतेय. प्रकाश झा यांच्यासारखे कलात्मक दिग्दर्शक आता आपल्याला चित्रपटात घेऊ लागल्याचा आनंद तिला झालाय. आता न्यूयॉर्कच्या यशाची ती वाट पहातेय.

Share this Story:

Follow Webdunia marathi