Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कतरीना रजनीकांतचा करिष्मा लवकरच पडद्यावर!

कतरीना रजनीकांतचा करिष्मा लवकरच पडद्यावर!

वेबदुनिया

चेन्नई , बुधवार, 11 जानेवारी 2012 (17:02 IST)
बॉलीवूडची साम्राज्ञी कतरीना कैफ लवकरच दक्षिणेचा देव रजनीकांतसोबत तामिळ सिनेमात काम करणार आहे. हा सिनेमा रजनीकांतची कन्यका सौंदर्या दिग्दर्शित करणार आहे. सूत्रांने दिलेल्या वृत्तानुसार हे खरे असून कतरीनाने यात काम करावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

दक्षिण आणि उत्तरेतील सुपरस्टार रुपेरी पडद्यावर एकत्र आले, तर जादू करतील यात काहीच शंका नाही. गेले काही दिवस यासंदर्भात बोलणी चालू आहेत. सध्या कतरीना यश चोप्राच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आणि येता काही महिन्यात तिने 'डेट्स' देण्याचे मान्य केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi