Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कमल हसनचे मतदारांना आवाहन

कमल हसनचे मतदारांना आवाहन
, सोमवार, 24 मार्च 2014 (17:57 IST)
अभिनेते कमल हसन यांनी एका व्हिडिओमधून मतासाठी पैसे घेऊन तुम्ही तुमचे भविष्य विकू नका, असे आवाहन केले आहे. तमिळनाडूमध्ये निवडणूक आयोगाने कॅश फॉर व्होटच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. याविषयी निवडणूक आयोगाने नुकताच एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

या व्हिडिओमधून पैसे घेऊन तुम्ही तुमचे मत विकू नका, असे आवाहन कमल हसन करत आहेत. कमल हसन म्हणाले, कोणता प्रतिनिधी निवडून द्यायचा, हा महत्त्वाचा निर्णय तुमच्या हातामध्ये आहे. पैसे घेऊन तुम्ही तुमचे भविष्य विकू नका. योग्य निर्णय घेऊन मोठय़ा प्रमाणात मतदान करा.

मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. देश चालविण्यासाठी योग्य प्रतिनिधीची गरज आहे, असंही कमल हसनने स्पष्ट केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi