Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काजोल-मनीषमध्ये निर्माण झाला दुरावा

काजोल-मनीषमध्ये निर्माण झाला दुरावा
, शनिवार, 3 ऑक्टोबर 2015 (09:03 IST)
बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या कित्येक वर्षे जुन्या मैत्रीला आता दृष्ट लागली आहे. कारण सध्या दोघांमध्ये ऑल इज वेल नसल्याचे समजते. बातम्यांनुसार, काही क्रिएटिव्ह डिफरन्सेसमुळे मनीषने आगामी ‘दिलवाले’ या सिनेमासाठी काजोलचे ड्रेसेस डिझाइन करणे बंद केले आहे. 
 
आलिया भट, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांसह अनेक आघाडीच्या अभिनेत्रींचे कपडे डिझाइन करणार्‍या मनीषला त्याच्या कामात काजोलचा हस्तक्षेप मुळीच आवडला नाही. सूत्रांच्या मते, काजोलने मनीषकडून फॅशन टिप्स घेणे बंद केले आणि ती स्वत:च आपली स्टाइल निश्चित ठरवत होती. ही गोष्ट मनीषला खटकली. मनीषने आता ‘दिलवाले’च्या सेटवर जाणे बंद केले आहे. तेथे तो आपल्या सहकार्‍यांना पाठवतोय. 
 
सध्या त्याने आपले लक्ष करण जोहरच्या आगामी ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमावर केंद्रित केले आहे. मनीष काजोलसाठी गेल्या 20 वर्षापासून काम करत आहे. काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘माय नेम इज खान’सह अनेक सिनेमांसाठी मनीषने तिचे ड्रेस डिझाइन केले आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi