Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉमेडी नाइट्स बचाओ च्या सेटवर अक्षयला आला राग

कॉमेडी नाइट्स बचाओ च्या सेटवर अक्षयला आला राग
‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या शोमध्ये येणार्‍या कलाकारांवर खूप वाईट जोक्स केले जातात तरी त्यांना हसत राहावं लागतं. काय करणार प्रमोशनसाठी अपमान सहन करावा लागतो. पण अलीकडेच या सेटवर अभिनेता अक्षय कुमार आणि सिद्धार्थ जाधव यांच्यात भांडण झाल्याचे समोर आले आहे. सिद्धार्थने अभिनेत्री लिझा हेडनची खिल्ली उडवल्यामुळे अक्षयचा ताबा सुटला. 
 
‘हाऊसफुल 3’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार, रितेश देशमुख, लिझा हेडन आणि जॅकलिन फर्नांडिस हे सर्व 'कॉमेडी नाइट्स बचाओ' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमात सिद्धार्थ जाधव द्वारे लिझा हेडनला ब्लॅक आफ्रिकन आणि कांगारू असे संबोधण्यात आले. लिझा हिला हिंदी समजत नसल्यामुळे ती त्याचा अर्थ समजू शकली नाही पण रितेश आणि अक्षयला राग आला. सूत्रांप्रमाणे अक्षयने सिद्धार्थला धक्का दिला. 
 
अक्षयप्रमाणे असे कमेंट करायला नको त्यावरून त्या भाषेत तर मुळीचंच नाही जी समोरच्याला समजत नसेल. मात्र या प्रकरणी असे काहीच घडले नसल्याचे सांगत वृत्त फेटाळून लावण्यात येत आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अरिजीतने मागितली सलमानची माफी