Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोयल राणाचे अपयश

कोयल राणाचे अपयश
, बुधवार, 17 डिसेंबर 2014 (14:07 IST)
मिस वर्ल्ड 2014 चा किताब दक्षिण आफ्रिकेच्या 22 वर्षीय रोलेन स्ट्रॉस हिने आपल्या नावे केला आहे. भारताच्यावतीने मिस इंडिया कोयल राणा या स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत जगभरातील 121 देशांतील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. भारताच्या कोयल राणाने या स्पर्धेत टॉप 10 पर्यंत मजल मारली. मात्र टॉप 5 मध्ये ती स्थान पटकावण्यात अपयशी ठरली. मात्र या स्पर्धेत कोयलने दोन पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. तिला या स्पर्धेत बेस्ट डिझायनर अँवॉर्ड आणि ब्युटी विथ अ पर्पज हे टायटल मिळाले. मूळची जयपूरची असलेल्या कोयलचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले. येथेच ती लहानाची मोठी झाली. तिने बिझनेस स्टडीजमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर हॉवर्ड युनिव्हर्सिटीतून इंटरनॅशनल फायनान्स या विषयात उच्च शिक्षण घेतले. 
 
एप्रिल 2014 मध्ये कोयलने मुंबईत मिस इंडिया 2014 चा किताब आपल्या नावे केला. यापूर्वी कोयलने 2008 मध्ये मिस इंडिया टीन आणि 2009 मध्ये मिस युनिव्हर्स टीनचा किताब जिंकला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi