Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घराला धूम्रपानमुक्त बनवलं अर्शदने

घराला धूम्रपानमुक्त बनवलं अर्शदने
, गुरूवार, 2 एप्रिल 2015 (10:35 IST)
अलीकडेच अशी बातमी आली आहे की, अभिनेता अर्शद वारसीने आपलं घराला धूम्रपानमुक्त बनवलं आहे म्हणून. जॉली एलएलबी फेम अर्शद वारसी नुकताच आपल्या नव्या घरात शिफ्ट झाला आहे. या नव्या घरात प्रवेश करताच, अर्शदने काही नवीन बदल घरात करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्शदने स्वत: घरात धूम्रपान न करण्याचा संकल्प केला आहे. अर्शदच्या या संकल्पामुळे त्याची पत्नी आणि मुलं मात्र खूपच खूश आहेत. लवकरच आपणही धूम्रपानमुक्त होऊ, असा आशावादही अर्शदने यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

खरं तर अभिनेता-अभिनेत्री फिटनेस आणि आपल्या दिसण्याला घेऊन खूपच सजग असतात. यासाठी ते खूप मेहनतदेखील घेतात. चांगला आहार आणि व्यायाम हा त्यांच्यावर दैनंदिनीचा अविभाज्य भाग असतो, पण त्यानंतरही त्यांच्या काही सवयी अशा असतात, ज्यांच्यापासून ते सुटकारा मिळवू शकत नाहीत. अशाच सवयीपैकी एक सवय म्हणजे धूम्रपान. बी-टाऊनचे कित्येक अभिनेते सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळले आहेत. या यादीत शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर यांच्यासह शर्मिला टागोर, मनीषा कोईरालासारख्या बॉलीवूड अभिनेत्रींचाही समावेश आहे. बिग बॉस फेम करिष्मा तन्नासुध्दा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना नजरेस पडली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi