Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'जज्बा'च्या सेटवर का रडली ऐश्वर्या राय बच्चन?

'जज्बा'च्या सेटवर का रडली ऐश्वर्या राय बच्चन?
, सोमवार, 14 सप्टेंबर 2015 (13:15 IST)
'जज्बा'च्या सेटवर ऐश्वर्या राय इतकी इमोशनल होऊन गेली की तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ऐश्वर्यासह इतर काही लोकंही इमोशनल होऊन गेले होते कारण की तो दिवस शूटिंगचा शेवटला दिवस होता. सूत्रांप्रमाणे शूटिंगच्या शेवटल्या दिवशी सेटवर प्रत्येक माणूस भावुक होता. हा शूटिंगचा 51 वा दिवस होता.
 
संजय गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटासाठी ऐश्वर्याने हार्ड वर्क केले आहे. जवळजवळ पाच वर्षांनंतर ती मोठ्या स्क्रीनवर दिसणार असून तिला माहीत आहे की फॅन्सला तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणून तिनी आपल्या परीने सर्वोत्तम देण्याचे प्रयत्न केले आहेत.


 
नऊ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार्‍या या चित्रपटात इरफान खान, शबाना आझमी, जैकी श्रॉफ आणि चंदन रॉय सान्याल मुख्य भूमिकेत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi