Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जया बच्चन यांनी पकडली चक्क वार्ताहराची कॉलर

जया बच्चन यांनी पकडली चक्क वार्ताहराची कॉलर
मुंबई , गुरूवार, 8 मे 2014 (17:09 IST)
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. जया बच्चन यांनी चक्क एका वार्तहराची कॉलर पडल्याची घटना घडली आहे.


जया बच्चन एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित झाल्या होत्या. तिने काही पत्रकारा आधीच उपस्थित होते. जया बच्चन आल्याचे पाहून एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला. परंतु जया बच्चन त्यांच्या भडकल्या. त्यांनी त्याची चक्क कॉलरच पकडली. पत्रकारांने जया बच्चन यांना बिग बीच्या प्रकृतीबाबत प्रश्न विचारल्याचे समजते.

परंतु, जया बच्चन प्रश्न करणार्‍या पत्रकारावर संतापल्या. 'माझ्यासोबत जास्त शहाणपणा करू नकोस' असे म्हणत चक्क त्यांनी पत्रकाराची कॉलर पकडली. त्यानंतर मात्र जया बच्चन तिथून तडक निघून गेल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi