Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिमी शेरगिल स्टारर चित्रपट 'शोरगुल'ला U/A सर्टिफिकेट

जिमी शेरगिल स्टारर चित्रपट 'शोरगुल'ला U/A सर्टिफिकेट
, गुरूवार, 26 मे 2016 (12:21 IST)
मुजफ्फरनगर, गोधरा आणि बाबरी मशीद विध्वंसांनंतर झालेले दंगे या विषयांच्या जवळपास फिरत असणारे चित्रपट 'शोरगुल'ला सेंसर बोर्डाने पास केले आहे. चित्रपटाला U/A सर्टिफिकेट देण्यात आले आहे. '24 एफपीएस फिल्म्स प्रॉडक्शन'च्या सीईओ समीरा केळकर यांनी एका विधानात सांगितले की, 'आम्ही खूश आहे की सेंसर बोर्डाने आम्हाला U/A सर्टिफिकेट दिले आहे आणि प्रेक्षक हे चित्रपट बघू शकतात.'
 
उत्तर प्रदेशाच्या पृष्ठभूमीवर आधारित चित्रपटात विवादांमध्ये राहिलेले दिग्गज लोकांचे राजनैतिक घोटाळ्यांना दर्शवण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्दशन जीतेंद्र तिवारी आणि प्रशांत वी. सिंह यांनी केले आहे. चित्रपटातील मुख्य कलाकारांमध्ये जिमी शेरगिल, हितेन तेजवानी, एजाज खान, आशुतोष राणा, नरेंद्र झा आणि संजय सूरी आहेत.  
 
जिमीने यात भाजपा विधायक संगीत सोमशी प्रेरित भूमिका साकारली आहे, संजयची भूमिका उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि नरेंद्र झाची भूमिका राज्य मंत्री आजम खांशी प्रेरित आहे. कलाकारांचे नाव देखील जवळपास आहे. जिमीला रंजीत सोम, संजयला   मिथिलेश यादव आणि नरेंद्र झा याला आलिम खां नाव देण्यात आले आहे. चित्रपट 24 जून रोजी रिलीज होणार आहे.   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘सैराट’मधून काही तरी शिका: इरफान खान