दिग्दर्शक साई कबीर यांच्या ‘डिव्हाईन लव्हर्स’ या आगामी चित्रपटात अभिनेत्री झरीन खानची वर्णी लागली आहे. सुरुवातीला कंगना राणावतला चित्रपटात घ्यायचे ठरले होते. मात्र आता कंगनाऐवजी झरीनची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता इरफान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
दिग्दर्शक कबीर म्हणाले, ‘डिव्हाईन लव्हर्स या चित्रपटासाठी आम्हाला पठाणी लूक असणारी अभिनेत्री हवी होती. कंगनाला सुरुवातीला घेण्याचे ठरले होते मात्र आम्ही आमचा विचार बदलला आहे. कंगनाच्या जागी आम्ही झरीन खानला घेण्याचे ठरवले आहे. झरीनचा लूक पठाणी असून ती या रोलसाठी परफेक्ट आहे असे आम्हाला वाटते. खरेतर कंगनाच्या तारखांचा खूपच गोंधळ होता. शूटिंगसाठी तिला तारखा देता येत नव्हत्या त्यामुळेही आम्ही नायिका बदलण्याचा निर्णय घेतला. ‘डिव्हाईन लव्हर्स’ चित्रपटाच्या शूटिंग आधी दोन महिने झरीनला प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. याचे निरीक्षण स्वत: इरफान खान करणार आहे. हा एक अँडव्हेंचर कॉमेडी चित्रपट असेल. चित्रपटाचे चित्रीकरण सप्टेंबरमध्ये सुरू होईल.