Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुषार कपूर संतापलाय

तुषार कपूर संतापलाय
IFM
तुषार कपूर सध्या भलताच संतापलाय. त्याचे कारण आहे, कॉमेडी सर्कस नावाचा कार्यक्रम. या कार्यक्रमात त्याचे वडिल जितेंद्र, बहिण एकता नि खुद्द त्यांची खिल्ली उडविण्यात आली. जंपिंग जॅक हे जितेंद्रचे टोपण नाव घेऊन या शोमधील कलावंतांनी त्यांची स्टाईल उचलत विनोद सादर केला. हे तुषारच्याही पाहण्यात आल्यानंतर तो संतापला आणि त्याने थेट कायदेशीर नोटीसच या शोच्या निर्मात्यांना पाठवली आहे. चेष्टा करण्याचीही एक मर्यादा असते. ती ओलांडली की अपमान होतो, असे त्याचे म्हणणे आहे. या कार्यक्रमाच्या जजेसनेही या चेष्टेवर आक्षेप घेतला नाही, याचेही त्याला वाईट वाटलेय.

Share this Story:

Follow Webdunia marathi