Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिलवाले'चे नवीन गीत 'जनम जनम...' झाले रिलीज

दिलवाले'चे नवीन गीत 'जनम जनम...' झाले रिलीज
मुंबई , शुक्रवार, 4 डिसेंबर 2015 (14:37 IST)
शाहरुख आणि काजोलचे अपकमिंग चित्रपट 'दिलवाले'चे तिसरे रोमँटिक साँग 'जनम जनम...' रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे काही बोल ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. या गाण्याला आवाज दिली आहे अरजित सिंह आणि अंतरा मित्राने. 
 
या आधी रिलीज साँग 'गेरुआ...' आणि 'मन मा इमोसन....' रिलीज करण्यात आले होते. 'गेरुआ...'ला आतापर्यंत इंटरनेटवर लाखो वेळा बघण्यात आले आहे. हे गीत लोकांच्या मनात घर करून चुकले आहे. आता बघायचे आहे की 'जनम जनम...' लोकांना किती प्रभावित करत. 
 

तसं तर 'जनम जनम...' गाण्यात शाहरुख आणि काजोलमध्ये चांगली केमिस्ट्री बघायला मिळत आहे. याचे एक दृश्य राज कपूर आणि नर्गिस यांचे लोकप्रिय गीत 'प्या हुआ इकरार हुआ है...'ची आठवण ताजे करून देतो. 
 
रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट 'दिलवाले'मध्ये शाहरुख आणि काजोलशिवाय वरुण धवन आणि कृती सेनन देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. हे चित्रपट 18 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi