Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीपिकाचा मुघलकालीन लुक

दीपिकाचा मुघलकालीन लुक
, मंगळवार, 30 जून 2015 (10:34 IST)
‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये मिन्नमा, ‘फाइंडिंग फॅनी’मध्ये गोव्यातील अँजी, ‘हॅपी न्यू इयर’मध्ये मोहिनी ही मराठी मुलगी आणि ‘पीकू’मध्ये बंगाली पीकू अशा वेगवेगळ्या ढंगातील भूमिका साकारणारी दीपिका पदुकोण आता मुघलकालीन अवतारामध्ये दिसणार आहे. 
 
संजय भन्साळीच्या ‘बाजीराव मस्तानी’मध्ये ती मस्तानीच्या भूमिकेत दिसणार आहे. मस्तानी ही बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल बुंदेला यांची मुलगी, पण आई रुहानी पार्शियन मुस्लिम होती. चित्रपटात नक्षीदार शरारा आणि कुर्त्यामध्ये दीपिका दिसणार आहे. डिझायनर अंजू मोदीने दीपिकाचे कॉस्ट्यूम बनवले आहेत. 
 
मस्तानीच्या भूमिकेमध्ये असलेल्या दीपिकाच्या कपड्यात लहंगा, शरारा आणि दुपट्टा यांचा समावेश करण्यात आला आहे. चित्रपटातील एका भागामध्ये पेशवा राणीप्रमाणे तिचा लुक असणार आहे. मस्तानी एक बुंदेल स्त्री होती, जी बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूच्या धक्क्याने तिचे निधन झाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi