Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दीपिका मला तुझा अभिमान आहे: रणवीर

दीपिका मला तुझा अभिमान आहे: रणवीर
, शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2016 (10:06 IST)
दीपिका पदुकोण आगामी हॉलिवूड चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न ऑफ एक्स जेंडर केज’ च्या शूटिंगसाठी कॅनडासाठी रवाना झाली. अभिनेता रणवीर सिंह याने ही माहिती दिली. याशिवाय मला दीपिकाचा अभिमान आहे. इतर चित्रपटांप्रमाणेच आगामी हॉलिवूड चित्रपटातही ती चांगले काम करेल. चित्रपटासाठी माझ्या तिला शुभेच्छा असं रणवीर यावेळी म्हणाला.

ट्रिपल एक्स या चित्रपटाद्वारे दीपिका हॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. यासाठी ती मोठी मेहनतही घेतेय. नुकताच तिचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. यात ती जिममध्ये पुशअप करताना दिसतेय. याशिवाय या चित्रपटातील फर्स्ट लुकही वायरल झाला होता. या चित्रपटात दीपिका हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विन डीजलसोबत काम करतेय. दीपिकाचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi