Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुबईवारी कशासाठी?

दुबईवारी कशासाठी?

वेबदुनिया

WD
इंडस्ट्रीत कोणासोबत कोणाचं नाव कधी जोडलं जाईल सांगता येत नाही. ‘बालिका वधू’मधली स्मिता बन्सल आणि त्याच मालिकेतला सिद्धार्थ शुक्ला यांचं अफेअर असल्याची चर्चा सध्या जोरावर आहे. दोघांनी नुकताच दुबईमध्ये खास एकत्र वेळही घालवलाय म्हणे. स्मिता एका दुकानाच्या उद्घाटनासाठी तिथे गेली होती. तेव्हा दोघं भेटले होते. पण, ‘मी दुबईला एका इव्हेंटसाठी गेले होते. अशा गॉसिप्सकडे मी फार लक्ष देत नाही. लोकांना चघळायला काही ना काही विषयच हवा असतो’, असं म्हणून तिने याचा इन्कार केल्याचा प्रयत्न केलाय. आपण कुठल्या इव्हेंटला गेलो होतो त्याची माहिती, त्याचे फोटो यातलं तिच्याकडे काहीच नाही. असो..असंही होऊ शकतं की कधीतरी. स्मिता तिच्या मालिकेतल्या व्यक्तिरेखेप्रमाणेच सालस आहे असं समजू आणि त्यामुळे ती म्हणतेय त्यावर विश्वास ठेवूया.

Share this Story:

Follow Webdunia marathi