Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नंबर 1च्या स्पर्धेत नाही - करिश्मा

नंबर 1च्या स्पर्धेत नाही - करिश्मा

वेबदुनिया

IFM
आपल्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही, तरीसुद्धा मला काही पश्चाताप नाही. पुनरागमनानंतर मी डेंजरस इश्क हा चित्रपट केला होता. हा चित्रपट सुपरहिट व्हावा अशी मी अपेक्षा केली नव्हती. त्याला यश मिळाले नाही म्हणून मी काही रडत बसले नाही. मी केव्हाचे हे विसरून गेले आहे, कारण मी इतर अभिनेत्रींप्रमाणे नंबर एकच्या स्पर्धेत नाही किंवा शंभर कोटींच्या स्पर्धेतही भाग घेत नाही, असे अभिनेत्री करिश्मा कपूरने एका मुलाखतीत म्हटले आहे. ती म्हणाली की, मला दोन लहना मुले आहेत आणि चित्रपटांपेक्षा मी त्यांना जास्त प्राधान्य देते. माझ्या मुलांनी हा चित्रपट पाहिल नाही. कारण या चित्रपटाला ए. सर्टिफिकेट मिळाले होते. सेटवर येण्याची आणि मी काय काम करते हे पाहण्याची त्यांची इच्छा असते, पण मी कधीच त्यांना सेटवर घेऊन जात नाही. या चित्रपटाला अपयश मिळाले म्हणून मी दुसरे चित्रपट करणार नाही, असे मु‍ळीच नाही. मला सध्या अनेक चित्रपटांची ऑफर आहे आणि मी दोन चित्रपट स्वीकारले आहेत. हे चित्रपट या वर्षीच्या शेवटपर्यंत प्रदर्शित होतील. तसेच माझ्याकडे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय जाहिरातीची रीघ लागलेली आहे. सध्या मी खूप व्यग्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi