Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाना पाटेकर सर्वात इमानदार व्यक्ती: जॉन अब्राहम

नाना पाटेकर सर्वात इमानदार व्यक्ती: जॉन अब्राहम
, गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (10:22 IST)
नाना पाटेकर त्यांच्या रागीट स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, त्यांचा राग हा कधीच चुकीच्या गोष्टींसाठी नसतो, हेही तितकेच खरं. बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमनेही नानांच्या या स्वभावाचे समर्थन केले आहे. 
 
नाना पाटेकर हे ज्येष्ठ कलाकार आहेत. ते प्रचंड विनम्र आहेत. नाना सिनेसृष्टीत सर्वात इमानदार व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या रागाला अर्थ असतो, असे अभिनेता जॉन अब्राहमचे मत आहे. समाजात जर काही वाईट घडत असेल, तर नाना त्या गोष्टीविरोधात आपलं मत मांडतात, निषेध व्यक्त करतात, असेही जॉनने सांगितले. 
 
नानांसोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता, असेही जॉन अब्राहमने आवर्जून सांगितले. याआधी ‘टॅक्सी नं. 9211’ मध्ये नाना पाटेकर आणि जॉन अब्राहम एकत्र दिसले होते. सुपरडुपर हिट ‘वेलकम’ सिनेमाच्या सीक्वलमध्ये जॉन आणि नाना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi