Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नित्या मेहराच्या चित्रपटात फरहान

नित्या मेहराच्या चित्रपटात फरहान
, मंगळवार, 21 एप्रिल 2015 (11:06 IST)
कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा याच्याचसोबतच एका प्रमुख भूमिकेत स्वत: निर्माता असलेला फरहान अख्तर आपल्या सहायकाच्या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. ‘लाइफ ऑफ पा’ आणि ‘द नेमसेक’सारख्या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शिकेचे काम केलेल्या नित्या मेहराच्या चित्रपटासाठी नुकतेच कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राचं नाव निश्चित झालं आहे. या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी करणार आहेत.

दोन अभिनेते असलेल्या या चित्रपटासाठी नित्याने चक्क फरहानलाच गळ घातली आहे. नित्याने फरहानच्या ‘डॉन’ व ‘लक्ष्य’साठी त्याला साहाय्य केले होते. खरं तर नित्याने फरहानला देऊ केलेला हा रोल महत्त्वपूर्ण आहे, मात्र त्याची लांबी किती असणार याबाबत अद्याप कळू शकलेलं नाही, पण एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच प्रेमकहाणीत या पात्राची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ही एक टाइम ट्रॅव्हलर (सिद्धार्थ) ची जटिल प्रेमकहाणी आहे. यात कॅटरिना सिद्धार्थच्या प्रेमिकेच्या भूमिकेत असणार आहे. नित्या या चित्रपटाचं चित्रीकरण लवकरच सुरू करण्याच्या विचारात आहे. सूत्रांच्या मते, नित्याच्या या चित्रपटाचं चित्रीकरण यावर्षीच अखेरीस सुरू होईल. तोपर्यंत कॅटरिना आणि सिद्धार्थ आपल्या चित्रपटाच्या कामात व्यस्त राहणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi