Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नीतू चंद्राने केला प्रेमाचा खुलासा!

नीतू चंद्राने केला प्रेमाचा खुलासा!

वेबदुनिया

, शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2011 (12:58 IST)
नीतू चंद्रा आणि रणदीप हुडा यांचा एका वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू आहे, पण दोघेही जगासमोर येणापासून वाचत असून त्यांनी मिडियालाही याबद्दल काही सांगितले नाही. ‘साहब बीवी आणि गँगस्टर’च्या यशानंतर जेव्हा पार्टी ठेवण्यात आली तेव्हा नीतू-रणदीपला एकत्र बघून सर्वांनाच आश्चर्य झाला. अस वाटत आहे की दोघही आपल्या संबंधाला नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन जाण्यास उत्सुक आहे.

रणदीपच्या लाईफमध्ये जेव्हा सुष्मिता सेन होती, तेव्हा दोघांनी आपल्या प्रेमाचे जगजाहीर केले होते. पार्ट्या, समारंभात ते दोघे सोबत दिसायचे. पण नीतूच्या बाबतीत रणदीपने सावधगिरी बाळगली. सूत्रांनी सांगितले की नीतूला वेळ हवा होता म्हणून ती याबद्दल सध्या काहीच बोलत नव्हती.

जेव्हा नीतूला अस वाटू लागले की रणदीपला ती पूर्णपणे समजून चुकली आहे त्यानंतरच दोघेही या समारंभात एकत्र दिसले. सध्या त्यांनी लग्नाबाबत काही विचार केलेला नाही आहे, पण जर दोघांमध्ये भविष्यात असच प्रेम राहिले तर ते नक्कीच लग्न करतील. सध्या दोघांसाठी त्यांचे करियर महत्त्वाचे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi