Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नृत्य दिग्दर्शक होणार रणवीर

नृत्य दिग्दर्शक होणार रणवीर
, रविवार, 19 ऑक्टोबर 2014 (12:02 IST)
बॉलिवूडमधील अनेक कलाकार अभिनय आणि नृत्य दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका साकारणे प्रकर्षाने टाळतात. परंतु अभिनेता रणवीर सिंह मात्र, दोन्ही जबाबदार्‍यांचे शिवधनुष्य एकाच वेळी पेलायचे ठरवले आहे. दिग्दर्शक शाद अली यांच्या ‘किल दिल’ या सिनेमात रणवीर मुख्य भूमिकेत असून नृत्य दिग्दर्शकांची जबाबदारीदेखील तो सांभाळणार असल्याचे कळते. या सिनेमात परिणिती चोप्रा, गोविंदा आणि अली जफर मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमातील एका गाण्याचे नृत्य दिग्दर्शन रणवीर सिंहने केले आहे. या गाण्याला गणेश आचार्य नृत्य दिग्दर्शन करणार होते. परंतु याबाबत बोलताना रणवीर म्हणाला की, अदनान सामी यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्यात मी आणि परिणिती चोप्रा रोमँटिक रुपात झळकणार आहे. या गाण्याचे चित्रिकरण असताना खूप मज्जा आली. त्यामुळे हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असेही रणवीरने म्हटले आहे. ‘किल दिल’ या सिनेमात गोविंदा नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi