Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पहा शाहरुखचा शो 'स्लेम! द टूर'चे फोटो

पहा शाहरुखचा शो 'स्लेम! द टूर'चे फोटो
, सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (13:51 IST)
विदेशात बॉलीवूड स्टारची लोकप्रियतेची गोष्ट करावी तर शाहरुख खानपुढे कोणीही टिकू शकत नाही. या गोष्टीचे प्रमाण परत एकदा मिळाले  जेव्हा किंग खानच्या 'स्लेम! द टूर'ला शानदार यश मिळाला. ह्यूस्टनच्या टोयोटा सेंटर आणि न्यू जर्सीच्या टीएक्स आणि काँटिनेंटल एरेनामध्ये 19 तथा 20 सप्टेंबरला हा शो परफॉर्म करण्यात आला, ज्यात फराह खान, दीपिका पादुकोण, मलाइका अरोरा खान, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, सोनू सूद, विवान शहासोबत गायक कनिका कपूर आणि यो यो हनी सिंहने परफॉर्म करून उपस्थित लोकांचे भरपूर मनोरंजन केले.  
 
शाहरुखने लार्जर देन लाईफ स्टायलमध्ये एरियल केबलच्या माध्यमाने एंट्री घेतली आणि आपल्या हिट गीत 'छम्मक छल्लो', 'काली काली आंखें', 'सूरज हुआ मद्धम' आणि 'डॉन'वर डांस केला. अभिषेक बच्चनाने 'कजरारे', मां दा लाडला', 'देसी गर्ल' आणि 'नंदू भेडे'वर डांस केला.  
 
फराह आणि बोमनने आपल्या परफॉर्मेंसच्या माध्यमाने लोकांचे मनोरंजन केले. मलायका अरोरा खान, विवान शाह, दीपिका पादुकोण, सोनू सूद आणि योयो हनी सिंहने देखील लोकांना मंत्रमुग्ध केले.  शोचे प्रमुख आकर्षण तेव्हा आले जेव्हा शाहरुख खानने ह्यूस्टन आणि न्यू जर्सीतून एक-एक कपलला बोलावले आणि त्यांना प्रश्न विचारले. 
 
विजेता कपलला लक्झरी बाइक देण्यात आली. या शोला पाहण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, मिडिल ईस्ट आणि अमेरिकेहून बरेच लोग आले होते.  21 सप्टेंबरला वाशिंगटन डीसीमध्ये शो झाल्यानंतर आता, 26 सप्टेंबरला शिकागो, 27 सप्टेंबरला वेंकूवर, 28 सप्टेंबरला सेन जोस आणि  पाच ऑक्टोबरला लंडनमध्ये हा शो होणार आहे. 
webdunia
 मलायकाची कातिल अदा
webdunia
दीपिकाची शानदार एंट्री
webdunia
मुन्नी गाण्यावर मलायका आणि सोनू सूद
webdunia
किंग खानची चिर-परि‍चित अदा
webdunia
अभिषेकपण रंगात दिसला 
webdunia
बोमन-फराहने आपल्या अदांमुळे सर्वांचे मनोरंजन केले  
webdunia
यो यो हनी सिंहचा जलवा
webdunia
किंग खानने एरियल केबलहून घेतली एंट्री
webdunia
शाहरुख आणि अभिषेक प्रस्तुति देताना 
webdunia
 
सोनू सूद

Share this Story:

Follow Webdunia marathi