Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'पानी वाला डान्स’ ने व्ह्यूअर्सला केले घायाळ

'पानी वाला डान्स’ ने व्ह्यूअर्सला केले घायाळ
, मंगळवार, 21 एप्रिल 2015 (11:13 IST)
बॉलीवूडची बेबी डॉल सनी लिऑनचं ‘पानी वाला डान्स’ सध्या यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात गाजत आहे. सनीच्या आगामी ‘कुछ कुछ लोचा है’ या सिनेमात सनीचं हे गाणं आहे, ज्यात सनी बोल्ड भूमिकेत आहे. अतिशय बोल्ड

आणि मादक नजरेने घायाळ करणार्‍या सनी लिऑनने यूट्यूबवरील व्ह्यूअर्सनाही घायाळ केले आहे. यूट्यूबवर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक हिटस् मिळाल्या आहेत.

या गाण्याचे लेखन केले आहे इक्का आणि आरको यांनी, तर या गाण्याला आवाज दिला आहे इक्का, आरको आणि श्रद्धा यांनी. या गाण्यात सनी लिऑनसोबत राम कपूरही दिसतात. ट्रेलरमध्ये राम कपूर हे विवाहित असून प्रवीण पटेल नावाच्या भूमिकेत आहेत. ज्या प्रवीण पटेलची शनाया म्हणजेच सनी लिऑनशी भेट होते आणि मग त्याच्या आयुष्यात एक ‘लोचा’ होतो. या मागेच या सिनेमाची कथा फिरते.

‘कुछ कुछ लोचा है’ या सिनेमातून नवदीप छाबरा हा नवोदित अभिनेता एंट्री करणार आहे. तो राम कपूरच्या मुलाची भूमिका बजावणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi