Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पॉप सिंगर हनी सिंहचं पुनरागमन

पॉप सिंगर हनी सिंहचं पुनरागमन
सिंगर-रॅपर यो यो हनी सिंह गेल्या काही दिवसांपासून गायब होता. कोणत्याही सिनेमाच्या प्रमोशनसाठी किंवा कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात तो दिसला नाही. त्याच या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण आलं होतं. मात्र, आता एका नव्या सिनेमासोबत हनी सिंहने पुनरागमन केलं आहे. 
 
हनी सिंहच्या नव्या सिनेमापेक्षा त्याच्या हेअर स्टाइल आणि सोन्याच्या दागिन्यांचीच चर्चा अधिक होताना दिसते आहे. नव्या लूकमधील हनी सिंहला पाहण्यासाठी चाहत्यांनीही मोठी गर्दी केली होती. ब्लॅक ड्रेसमधील हनी सिंहने हेअर स्टाइलही बदलली असून त्याने वजनही खूप वाढवलं आहे. शिवाय, गळ्यात साखळदंडासारखा सोन्याचा दागिना आहे. पंजाबी सिनेमा ‘जोरावर’च्या पोस्टर रिलीजसाठी हनी सिंह खूप दिवसांनी सार्वजनिक व्यासपीठावर दिसला. त्यावेळी त्याने उपस्थितांशी नव्या लूकबाबत फार काही बोलणं टाळलं, मात्र हनीच्या नव्या लूककडे सर्वजण उत्सुकतेने पाहात होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi