Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रियंका-अनुष्का स्टारर 'दिल धड़कने दो'चे ट्रेलर(video)

प्रियंका-अनुष्का स्टारर 'दिल धड़कने दो'चे ट्रेलर(video)
मुंबई , शुक्रवार, 17 एप्रिल 2015 (11:39 IST)
प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंह स्टारर चित्रपट 'दिल धड़कने दो'चे ट्रेलर रिलीज झाले आहे. ही कथा मेहरा फॅमिलीची आहे. या रईस कुटुंबाचे सदस्य आहे अनिल कपूर, शेफाली शाह, रणवीर सिंह आणि प्रियंका चोप्रा. वैचारिक मतभेदांमुळे लहान सहान गोष्टींवरून त्यांच्यात वाद होत असतात. नंतर संपूर्ण कुटुंब एका पाण्याच्या जहाजात जातो आणि कथा पुढे वाढते. हे तुटलेले कुटुंब कसे एकत्र येतो, चित्रपटाची कथा या थीमवर आहे.  
 
रणवीर चित्रपटात कबीर मेहरा नावाचे कॅरेक्टर मध्ये आहे आणि प्रियंकाने चित्रपटात आयशा मेहराची भूमिका साकारली आहे. अनुष्का फराह 
 
नवाची साधारण, पण महत्वाकांक्षी मुलीच्या भूमिकेत आहे, जी डांसर बनण्यासाठी  घरातून पळून जाते. क्रूझवर फराहची भेट कबीरशी होते आणि दोघं एक मेकांच्या प्रेमात पडतात. ट्रेलरनुसार, कबीरचे आपले वडिल कमल मेहरा (अनिल कपूर)शी संबंध चांगले नसतात आणि त्यांच्यात सतत वाद विवाद होत राहतात. चित्रपटाचे निर्देशन जोया अख्तरने केले असून फरहान अख्तर, राहुल बोस, रिद्धिमा सूद, शेफाली शाह आणि जरीना वहाब यांच्याही मुख्य भूमिका आहेत. चित्रपट या वर्षी 5 जून रोजी रिलीज होणार आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi