Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रियांकाला करायचा आहे परिणितीसोबत स्क्रीन शेअर

प्रियांकाला करायचा आहे परिणितीसोबत स्क्रीन शेअर
, बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (13:10 IST)
अभिनेत्री प्रियांका चोप्राला परिणिती चोप्रासोबत काम करण्याची इच्छा असून नुकतेच एका मुलाखतीत याबाबत विचारणा झाली असता ती म्हणाली की, ‘आम्ही दोघींनी आतापर्यंत एखादा चित्रपट सोबत करायला हवा होता; पण आजवर ज्या ऑफर्स आमच्याकडे आल्या त्या फारशा चांगल्या नव्हत्या. मला परीसोबत स्क्रिनशेअर करण्याची इच्छा आहे; पण चित्रपटाची स्क्रिप्ट दमदार हवी. ती खूप चांगली अभिनेत्री आहे आणि तिच्यासोबत काम करताना मजा येईल.’ 
 
परिणितीच्या गायक बनण्याच्या इच्छेबाबत जेव्हा तिला विचारण्यात आले तेव्हा प्रियांका म्हणाली की, ‘आमच्या घरात सर्वच गायक आहेत, माझ्या मते कोणीही गायक बनू शकतात. जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल, तर तुम्ही काहीही काम करू शकता.’

Share this Story:

Follow Webdunia marathi