Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रीतिच्या सुंदर चेहर्‍यावर नेसने पेटत्या सिगारेट फेकल्या

प्रीतिच्या सुंदर चेहर्‍यावर नेसने पेटत्या सिगारेट फेकल्या
मुंबई , बुधवार, 23 जुलै 2014 (13:25 IST)
प्रिती जिंटाचा आरोप आहे की उद्योगपती नेस वाडिया पेटती सिगारेट अंगावर फेके, खोलीत कोंडून ठेवत असे. दिवसेंदिवस त्याची क्रूरता वाढू लागली. कधी रागाच्या भरात तो माझी हत्या करेल, अशी भीती मला होती. प्रीतीने केलेल्या तक्रारीनुसार, मरीनड्राईव्ह पोलिसांनी नेस यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रीतीच्या या तक्रारीची पोलीस नेसकडे चौकशी करू शकतील. परदेशात जाण्यापूर्वी प्रीती 30 जूनला पोलिस आयुक्त मारिया यांना भेटली होती. या वेळी तिने मारिया यांना पत्रही लिहिले होते.  नेस याला कोणत्याही प्रकारे हानी पोचवण्याचा आपला उद्देश नाही. केवळ स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आपण पोलिसांकडे धाव घेतल्याचेही तिने पत्रात लिहिले आहे. नेस वाडिया यांनी मात्र सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi