Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिग बींचा लोणावळ्याच्या म्युझियममध्ये मेणाचा पुतळा

बिग बींचा लोणावळ्याच्या म्युझियममध्ये मेणाचा पुतळा
, मंगळवार, 15 डिसेंबर 2015 (10:13 IST)
सर्वाचा लाडका अभिनेता बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर फोटो काढायचा आहे? आता नक्कीच काढता येईल. कारण लोणावळ्याच्या सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियममध्ये आता अमिताभ बच्चन यांचाही पुतळा दाखल झाला आहे. प्रत्यक्ष अमिताभबरोबर नाही पण त्यांच्या पुतळ्याबरोबर तुम्हाला नक्कीच फोटो काढता येणार आहे. या पुतळ्याचे अद्याप अनावरण झाले नसले तरी तो प्रेक्षकांना पाहण्यासाठी मागील आठवडाभरापासून खुला करण्यात आला असल्याचे हा पुतळा प्रत्यक्षात साकारणारे कलाकार सुनील कंडलूर यांनी सांगितले. 
 
लोणावळा शहरापासून 4 किमी अंतरावर पुण्याच्या दिशेला वरसोली गावात 2010 पासून सुनील कंडलूर यांचे सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम आहे. या ठिकाणी मागील 8 महिन्यांपासून हा अमिताभ बच्चन यांचा मेणाचा पुतळा बनविण्याचे काम सुरू होते. हा संपूर्ण पुतळा बच्चन यांचे कसलेही मोजमाप न घेता केवळ छायाचित्र पाहून बनविण्यात आला आहे. हा पुतळा बनविणे तसे आव्हानात्मक काम होते मात्र हा पुतळा तयार झाल्यानंतर त्यामधील जिवंतपणा पाहून आपण वास्तवातील बिग बी समोर उभे असल्याचा भास होतो, असे कंडलूर यांनी सांगितले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi