Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिग बी करणार किसान चॅनलचा प्रचार

बिग बी करणार किसान चॅनलचा प्रचार
, गुरूवार, 28 मे 2015 (15:34 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केलेल्या किसान चॅनलचं प्रमोशन बिग बी अमिताभ बच्चन करणार आहेत. या चॅनलची लोकप्रियता वाढावी यासाठी एक अभियान करण्यात येणार आहे. 
 
यामध्ये अमिताभ बच्चन दिसणार आहेत. दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, अमिताभ हे वेगवेगळ्या माध्यमातून या चॅनेलचे प्रमोशन करतील. प्रसार भारतीचे अतिरिक्त महानिर्देशक रंजन मुखर्जी यांनी अमिताभ या चॅनलचे प्रमोशन करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
 
या चॅनलचं काम शेतकर्‍यांना मध्यवर्ती भूमिकेत ठेवून करण्यात येणार आहे. यामध्ये शेती, हवामान आणि शेतीविषयक संबंधित बातम्या पाहायला मिळतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi