Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिपाशाचा राइट चॉइस

बिपाशाचा राइट चॉइस

वेबदुनिया

, शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2014 (13:09 IST)
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू हिचं प्रेमप्रकरण नेहमीच चर्चेत असतं. बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम यांच्या दीर्घकालीन नातेसंबंधांना 2001 मध्ये ब्रेक लागला. जॉन अब्राहमशिवाय बिप्सचं नाव शाहिद कपूर, राना दगुबत्ती, जोश हर्नेट यांच्यासोबतही जुळलं होतं. बिपाशाच्या जीवनात आता एंट्री केली ती हरमन बावेजाने, तिचं सूत हरमन बावेजाबरोबर जुळल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली होती. या दोघांना एकत्र हिंडतानाही कित्येकांनी पाहिलं होतं.

पण खरं का आणि खोटं का याचा उलगडा त्यांनी केला नव्हता. काही दिवसांपूर्वी बिप्सनं हरमनसोबतच नातेसंबंधांचा खुलासा ट्विटरवर केला आहे. हॉट बिप्सला तिचा मिस्टर राइट मिळाला आहे.

ती म्हणते, हो. मी आणि हरमन जोडीदार आहोत. माझ्यापेक्षा चांगला माणूस असणार्‍या व्यक्तीला मी साथीदार म्हणून निवडला आहे, म्हणून मी खूप खूश आहे आणि हे तिने बेधडक सांगितलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi