Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलीवुडने मला धोका दिला- राखी

बॉलीवुडने मला धोका दिला- राखी

वेबदुनिया

मुंबई , मंगळवार, 31 ऑगस्ट 2010 (12:51 IST)
आयटम गर्ल राखी सावंत नेहमीच नवीन वाद जन्माला घालत असते. आता तिने चक्क बॉलीवुडलाच बदनाम करण्‍यास सुरुवात केली आहे. बॉलीवुडने आपल्याला धोका दिल्याने आता आपण छोट्या पडद्यांकडे वळणार असल्याचे तिने म्हटले आहे.

यापुढील काळात आपण बॉलीवुडमध्ये चित्रपट न करण्‍याचा निर्णय घेतल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. आपण आतापर्यंत जेवढ्या चित्रपटात काम केले, त्या सार्‍या चित्रपटातील आपला रोल कापण्यात आला. त्याला कात्री लावल्यानेच लोकांपर्यंत आपला अभिनय पोहचू शकला नसल्याचे तिने म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi