Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलीवूडमध्ये!पाकची सर्वात महागडी नटी

बॉलीवूडमध्ये!पाकची सर्वात महागडी नटी
, सोमवार, 14 जुलै 2014 (14:57 IST)
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री असलेली हुमेमा मलिक हिचे म्हणणे आहे की ती पाकची सगळ्यात महागडी अभिनेत्री आहे. हुमेमा इम्रान हाशमीसोबत कुणाल देशमुख यांच्या 'राजा नटवरलाल' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये दाखल होत आहे. २५ वर्षीय हुमेमा सुंदर असण्याबरोबरच स्मार्टही आहे. एवढय़ा वयातच ती संपूर्ण जग फिरून आली आहे. मात्र वेळोवेळी आईच्या सल्ल्यानुसार ती वागते. ती कराचीमध्ये राहते. तिला मुंबई खूप आवडते. संपन्न कुटुंबातून आलेली ही अभिनेत्री वयाच्या १४व्या वर्षीच पाकची सर्वात मोठी मॉडेल बनली. २२व्या वर्षी तिने पाकमधील सर्वात चर्चेत असलेल्या 'बोल' या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली! आता ती बॉलीवूडमध्ये काय जादू दाखवते त्यावरच तिचा पुढचा प्रवास अवलंबून आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi