Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भट्ट कॅम्पच्या ‘आशिकी’ची 25 वर्षे

भट्ट कॅम्पच्या ‘आशिकी’ची 25 वर्षे
, शनिवार, 25 जुलै 2015 (14:57 IST)
23 जुलै 1990 साली प्रदर्शित झालेल्या महेश भट्ट दिग्दर्शित आशिकी या सिनेमाने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले होते. या सिनेमाची गाणी आजही सगळ्यांना भुरळ घालतात. आशिकीला 25 वर्षे पूर्ण झाली असून तरुणाईमध्ये आजही आशिकीची क्रेझ कायम आहे. 90 च्या दशकात या सिनेमाने रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. या सिनेमाची गाणी तर आजही सिनेरसिकांच्या ओठावर आहेत. राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांची प्रमुख भूमिका असलेल्या आशिकीने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळविलं होतं. बॉलिवूडमध्ये इतिहास घडविणार्‍या या सिनेमाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 23 जुलै 1990 साली प्रदर्शित झालेल्या महेश भट्ट दिग्दर्शित या प्रेमकथेने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले होते. सिनेमातील प्रत्येक गाण्याने तरुणाईला भुरळ घातली होती. आजही या सिनेमाची गाणी रसिक गुणगुणतांना दिसतात.. ‘न भूतो न भविष्यती’ असं यश या सिनेमाने मिळविलं होतं. खरंतर राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या फ्रेश कपलवर निर्मात्यांनी सट्टा खेळला होता. मात्र, सिनेमातील या दोघांच्या अभिनयापेक्षा सिनेमातील गाण्यांचीच जास्त चर्चा झाली. नदीम-श्रवण या जोडीने संगीतबध्द केलेली ही गाणी ऑलटाईम हिट ठरलीत. आशिकी सिनेमाची क्रेझच इतकी होती की भट्ट कॅम्पने बनविलेल्या ‘आशिकी 2’ या सिनेमालाही धमाकेदार यश मिळाले. 2013 साली आलेल्या ‘आशिकी 2’ मध्येही भट्ट कॅम्पने आदित्य रॉय कपूर आणि श्रध्दा कपूर या फ्रेश कपलला चान्स दिला. यावेळी, मात्र दोन्ही कलाकारांनी हा विश्वास सार्थ ठरवत सिनेमात सहजसुंदर अभिनय केला. सिनेमातील गाण्यांबरोबरच आदित्य आणि श्रध्दाच्या कामाचंही खूप कौतुक झालं. मोहित सुरीने आशिकी-2 चं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमानं 100 कोटींची कमाई करत श्रध्दा कपूरलाही रातोरात स्टार बनविलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi