Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय हाच माझा धर्म: नाना

भारतीय हाच माझा धर्म: नाना
, गुरूवार, 11 फेब्रुवारी 2016 (09:41 IST)
प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी भारत धर्मनिरपेक्ष म्हणता तर प्रत्येक फॉर्मवर धर्म जातीचा कॉलम काढून का टाकत नाही? असा प्रश्न करून आपण भारतीय असून, आपला धर्म व जात ही भारतीय असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
सिंधुदुर्गात ‘नाम’ फाउंडेशनची शाखा सुरू करून कोकणातील शेतकर्‍यांनादेखील साथ देण्याची ग्वाही त्यांनी दिली. नाना पाटेकर यांनी आचरा न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकमहोत्सवी सांगता सोहळ्यात विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. आपण जात, धर्म मानत नाही. आपण भारतीय आहोत, याचाच अभिमान असल्याचेही ते म्हणाले. माणसामध्ये खलनायकही असतो आणि नायकही असतो. 
 
खलनायक व्हायचे की नायक व्हायचे हे ज्याने त्याने आपले ठरवायचे असते. आपल्यातील माणुसकी जगवण्याचा प्रयत्न नायक होऊन केला तर माणूस म्हणून जीवन जगल्याचे समाधान मिळेल असे ‘नाम’ फाउंडेशनचे संस्थापक व अभिनेता नाना पाटेकर म्हणाले. कोकणातही नाम संस्था काम करणार आहे. त्यासाठी सिंधुदुर्गात शाखा स्थापनेचा मनोदय पाटेकर यांनी व्यक्त केला. 
 
भारताला स्वातंर्त्य मिळाले. आपण स्वतंत्र झालो असे कसे म्हणायचे असा सवाल नाना पाटेकर यांनी करून आपल्याकडे मूठभर असेल तर चिमूटभर दुसर्‍याला देण्याची दानत हवी. ती जर नसेल तर जगण्याला अर्थ राहत नाही, असे नाना पाटेकर म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi