Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भूजमध्ये हृतिक

भूजमध्ये हृतिक
, शनिवार, 31 जानेवारी 2015 (12:36 IST)
प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन ‘मोहंजोदडो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भूजमध्ये दाखल झाला असून दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या मोहंजोदडो चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा हृतिक याआधी मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या बँग बँग चित्रपटात दिसला होता. मोहंजोदडो चित्रपटाद्वारे दुसर्‍यांदा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि हृतिक रोशन ही जोडी एकत्र येत असून, याआधी जोधा अकबर हा सुपरहिट चित्रपट या दोघांनी एकत्र केला होता. जोधा अकबर चित्रपटात हृतिकने बादशहा अकबरची मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. 2016 मध्ये प्रदर्शित होणार्‍या मोहंजोदडो चित्रपटाद्वारे अभिनेत्री पूजा हेगडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. 27 जानेवारीपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणास प्रारंभ झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi