Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भोजपूरी चित्रपटात वाढतेय अश्लीलता!

भोजपूरी चित्रपटात वाढतेय अश्लीलता!

वेबदुनिया

पाटना , मंगळवार, 31 ऑगस्ट 2010 (11:22 IST)
भाषिक चित्रपट म्हणून एकेकाळी भोजपूरी चित्रपटांकडे पाहिले जात. आता मात्र या चित्रपटातील अश्लीलता वाढत असून, ‘लहरिया लूट आए राजाजी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जमलेल्या स्टार्सनी सार्‍यांसमोरच चुंबन घेण्‍यास सुरुवात केल्याने खळबळ माजली आहे.

पाटन्यातील उमा चित्रपटगृहात या चित्रपटाच्या प्रमोशनचे आयोजन करण्‍यात आले होते. या दरम्यान मनोज पांडे या भोजपूरी अभिनेत्याने या चित्रपटाची नायिका सुप्रेरणा हिचे चित्रपटगृहात प्रवेश करेपर्यंत चुंबन घेतले. यावर खुलासा करताना त्याने चक्क बिहारी जनतेनेच आता थोडे बोल्ड होणे गरजेचे असल्याचे म्हटल्याने बिहार मधील त्याचे चाहते नाराज झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi