Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मणिरत्नमचा चित्रपट ऐश्वर्या करणार काम

मणिरत्नमचा चित्रपट ऐश्वर्या करणार काम
, शनिवार, 30 मे 2015 (17:25 IST)
गतवर्षीच मणिरत्नमच्या चित्रपटातून ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याची घोषणा केली होती मात्र काही तांत्रिक कारणाने हा चित्रपट पुढे ढकलला गेला. परिणामी संजय गुप्ताच्या जज्बा मधून ऐश्वर्याचे पुनरागमन झाले. मात्र मणिरत्नमचा चित्रपट ऐश्वर्याने सोडलेला नाही तर हा चित्रपट करत असल्याचे तिने नुकतेच जाहीर केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागाजरुन आणि महेश बाबूही काम करणार आहेत.
 
मणिरत्नम यांनीही त्यांच्या आजारपणानंतर या चित्रपटावर पुन्हा उमेदीने काम सुरू केले असून त्यांचे यासंदर्भात ऐश्वर्याशी नुकतेच बोलणे झाल्याचेही तिने सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi