Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठमोळ्या वैभवच्या मदतीला ‘बाजीराव’

मराठमोळ्या वैभवच्या मदतीला ‘बाजीराव’
, सोमवार, 22 फेब्रुवारी 2016 (09:59 IST)
‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात रणवीर सिंहच्या भावाची भूमिका बजावणारा मराठमोळा अभिनेता वैभव तत्त्ववादीच्या मदतीला खुद्द ‘बाजीराव’ धावला आहे. वैभवची भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’च्या प्रमोशनसाठी रणवीर सिंह मैदानात उतरला आहे. रणवीर सिंहने वैभवच्या ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. वैभवने ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमात बाजीराव पेशव्यांचे बंधू अर्थात चिमाजी अप्पांची भूमिका साकारली आहे. या सिनेमात रणवीर सिंहने बाजीराव पेशव्यांची भूमिका साकारली आहे. 
 
‘बाजीराव मस्तानी’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान रणवीर आणि वैभवची खास मैत्री झाली होती. सिनेमात जरी दोघांचे विचार वेगळे दिसत असले, तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र दोघे एकमेकांचा आदर करतात. रणवीरने वैभवच्या समर्थनार्थ एक व्हिडिओही जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये रणवीर म्हणतो, हाय मी रणवीर, माझा भाऊ वैभवचा सिनेमा ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ पाहायला विसरू नका ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ हा मराठी रोमँटिक सिनेमा आहे. या सिनेमात प्रार्थना बेहेरे, वैभव तत्त्ववादी, उमा सरदेशमुख आणि मोहन जोशींसारखे अभिनेते आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi