Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मलाईकाचं वॉर्डरोब मालफंक्शन

मलाईकाचं वॉर्डरोब मालफंक्शन
, सोमवार, 20 एप्रिल 2015 (10:53 IST)
आयटम डान्ससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आणि सलमान खानची वहिनी म्हणजेच मलाईका अरोरा खानला एका टीव्ही शो दरम्यान ‘वॉर्डरोब मालफंक्शन’ला सामोरं जावं लागलंय.

त्याचं झालं असं की, ‘इंडियाज गॉट टॅलेंट - सीझन 6’ या टीव्ही कार्यक्रमासाठी मलाईका एका गाण्यावर डान्स शूट करत होती. एका आयटम साँगवर डान्स परफॉर्मन्स देताना तिच्या ड्रेसच्या वरचा भाग मागच्या बाजूनं उघडला गेला. हे लक्षात आल्यानंतर मलाईकानं स्वत:ला सावरत पटकन स्टेजवरून मागच्या बाजूला धाव घेतली. ही घटना जेव्हा घडली तेव्हा या कार्यक्रमाचे जज करण जोहर आणि किरण खेरही तिथेच उपस्थित होते. पण, नंतर लक्षात आलं की ती मलाईका नव्हती तर तिच्याचसारखी दिसणारी दुसरी मुलगी होती.. हा सगळा प्रकार त्यांनी टीम्सला सरप्राइज देण्यासाठी केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi