Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मलायका करणार अरबाजसोबत शो होस्ट

मलायका करणार अरबाजसोबत शो होस्ट
, शनिवार, 3 ऑक्टोबर 2015 (08:59 IST)
सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खानने शो होस्टिंग करायचं ठरवलं आहे. सलमान खान सध्या वादग्रस्त टीव्ही शो बिग बॉसमध्ये व्यस्त आहे, दुसरीकडे अरबाज खान आपली पत्नी मलायका अरोराला घेऊन एक कपल टीव्ही शो होस्ट करणार आहे. 
 
अरबाज खानची पत्नी मलायका अरोराने म्हटलं आहे की, ती लवकरच एका कपल रिअँलिटी शो मध्ये दिसणार आहे. डान्सर, कोरियोग्राफर, जज सेलिब्रिटी मलायका अरोरा आता एक कपल रिअँलिटी शो होस्ट करणार आहे. या शोचं नाव पॉवर कपल्स असणार आहे, हा शो लवकरच ऑन एअर होणार आहे.

मलायका अरोरा हा प्रसिद्ध चेहरा आहे, मागील काही डान्स रिअँलिटी शो झलक दिखला जा काही एपिसोडमध्ये ती जजच्या भूमिकेत होती. अरबाज म्हणतो की, पहिल्यांदा एक टीव्ही शो होस्ट करतोय, मलायका सोबत असल्याने मला एक रोमांचित अनुभव येणार आहे. शो चा फॉर्मेट इन्टरेस्टिंग असल्याचं अरबाज म्हणतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi